लोकसभा निवडणुक 2019 : उमेदवार यादीवर नितीन गडकरींच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’चा शिक्का

नागपूर –  लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली. यातच विदर्भातील नागपुर येथे ज्या मतदान केंद्रावर मुख्यमंत्री मतदानाचा हक्क बजावतात त्याच मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे तब्बल तासभर लोक खोळंबली होती. धरमपेठ स्कूल इथल्या मतकेंद्रावर मुख्यमंत्री मतदान करतात. त्याठिकाणी हा प्रकार घडला. तर दुसरीकडे  न्यू इंग्लिश स्कूल इथल्या मतदान केंद्रावर चक्क उमेदवार यादीवरच शिक्के मारण्यात आले होते. मतदारांना उमेदवारांची माहिती व्हावी, यासाठी मतदान केंद्रबाहेर उमेदवारांची यादी लावली जाते. मात्र या यादीवर गडकरींच्या फोटो आणि नावापुढे रिजेक्टेड असे शिक्के मारण्यात आले होते. वृत्तवहिनीला  मिळालेल्या माहितीनुसार  हे शिक्के कुणी मारले हे अद्याप अस्पष्ट आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.