Lok Sabha Election 2024 | Election Commission | Sweep Campaign – सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी देशभर वाढावी म्हणून निवडणूक आयोगाने एक अनोखी मतदार जागृती अभियानाची संकल्पना मांडली असून, त्याअंतर्गत प्रत्येक राज्यात काम सुरु करण्यात आले आहे. पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) असे या योजनेचे नाव आहे.
यामध्ये मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी, मतदार यादीतील तपशील दुरुस्त करणे आणि स्थलांतरित आणि मृत कुटुंबातील सदस्यांचे नाव हटविण्यासंबंधीच्या प्रक्रियेबाबत मतदारांना शिक्षित करण्यासाठी राबवले जातात.
तसेच ऑनलाइन, ऑफलाइन सुविधांद्वारे मतदान कसे करावे, निवडणुकीदरम्यान भ्रष्ट प्रथा रोखण्यासाठी निवडणूक यंत्रणेला कशी मदत करावी इत्यादींची माहिती दिली जात आहे.
‘स्वीप योजना’ काय आहे ?
१. सर्व बस, रेल्वे, मेट्रो स्टाॅपवर आणि पोस्ट ऑफिसेसवर डिजिटल स्क्रीन बसवून मतदार जागरूकता संदेश आणि क्रिएटिव्ह प्रदर्शित करून रस्त्यावरील जागरुकता मोहीम चालवली जात आहे.
२. आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये सार्वजनिक सूचनांचे प्रकाशन, मतदान प्रक्रियेच्या तारखा, अंतिम मतदार यादीचे प्रकाशन आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका यासारख्या प्रसंगी वर्तमानपत्रांमध्ये रंगीत जाहिरातींचे प्रकाशन केले जात आहे.
३. महिला, प्रथम मतदार, ट्रान्सजेंडर मतदार, सेवेतील मतदार, ज्येष्ठ नागरिक, गृहिणी इत्यादी मतदारांच्या विविध श्रेणींवर लक्ष केंद्रित करणाऱ्याजाहिराती आणि रेडिओ जिंगल्सचे एफएम रेडिओ चॅनेलवर प्रसारण सध्या सुरु आहे.
४. आकाशवाणीवर फोन-इन कार्यक्रम सादर करुन निवडणूक प्रक्रियेविषयी माहिती दिली जात आहे.
५. मतदारांच्या जागरूकता आणि शिक्षणासाठी मोठ्या संख्येने सरकारच्या वेबसाइट्सचा वापर केला जात आहे.
६. वृत्तपत्र विक्रेत्यांमार्फत सर्वसामान्य जनतेमध्ये मतदार जनजागृती सामग्री असलेल्या पत्रकांचे वितरण.
७. ऑटो रिक्षातून मतदानाविषयी घोषणा देणे आणि जिल्हा कार्यालयांद्वारे नुक्कड नाटकांचे आयोजन केले जात आहे.
८. आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामद्वारे मतदानाविषयी जनजागृती घडवली जात आहे.
९. स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मतदानाची माॅक-ड्रील्सही घेतली जात आहेत.
१०. मतदान यंत्रांविषयीचे गैरसमज दूर करणासाठीही मोहिमा राबवल्या जात आहेत.