मोठी बातमी : अनलाॅक 5.0ची मुदत वाढवली; कंटेन्मेंट झोनमध्ये ‘लाॅकडाऊन’ सुरूच राहणार

नवी दिल्ली – अनलाॅक 5.0 ची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून कंटेन्मेंट झोनमध्ये लाॅकडाऊन सुरूच राहणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे.

कोरोनाची साथ अजुन संपलेली नाही त्यामुळे सावधगीरी बाळगण्याची गरज आहे. अनलाॅक 5.0 मध्ये जी बंधने होती तीच बंधने 30 नोव्हेंबरपर्यंत असणार आहेत. तसेच कंटेन्मेंट झोनमध्ये कडक लाॅकडाऊन सुरूच असेल, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरीही धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे, असेही सरकारने म्हटले आहे.

गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून भारत कोरोनाशी लढा देत आहे. 22 मार्चपासून देशातील मृत्यूदर निच्चांकी पातळीवर आल्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. देशाचा सध्याचा मृत्यू दर हा केवळ 1.5 टक्के आहे. तसेच गेल्या 24 तासात भारतात 500 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.