नांदूरच्या ग्रामपंचायतीवर आमदार कुल गटाची सरशी

रवींद्र बोराटे झाले बिनविरोध उपसरपंच

नांदूर (पुणे) – दौंड तालुक्‍यातील नांदूर येथील उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल समर्थक रवींद्र बोराटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

औद्यगिक टापूतील महत्वपूर्ण ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच कैलास गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्‍त झाले होते. या पदावर बोराटे यांना सर्वानुमते संधी देण्यात आली. दोन सदस्यांनी सत्ताधारी गटामधून आमदार राहुल कुल गटामध्ये प्रवेश केल्याने उपसरपंच पदावर थोरात गटाला साधा उमेदवार उभा करता आला नाही.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य शितल बोराटे, नीता घुले, कैलास गायकवाड, भारती बोराटे, नेहा गुरव, नामदेव बोराटे, रेश्‍मा बोराटे, मयुर घुले, किशोर बोराटे, युवराज बोराटे, जालिंदर घुले, किरण गुरव, प्रवीण बोराटे, राहुल बोराटे, संजय थोरात, सचिन बोराटे, बापू गायकवाड, बबन बोराटे, राहुल गुरव, प्रवीण बोराटे, हेमंत घुले, उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निलेश धारकर यांनी काम पाहिले. निवडीच्यावेळी यवत पोलीस स्टेशनचे दत्ता खाडे, संतोष पंडीत, पोलीस पाटील नेहा बोराटे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. संजय थोरात यांनी स्वागत केले. प्रवीण बोराटे यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.