प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 2 लाख 87 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

नोंदणीसाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत; निश्‍चित करून दिलेल्या संख्येच्या कोट्याचा पल्ला ओलांडला

पुणे – धार्मिक अल्पसंख्याक प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 2 लाख 87 हजार 284 विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी झाली आहे. शिष्यवृत्तीसाठी निश्‍चित करून दिलेल्या संख्येच्या कोट्याचा पल्ला ओलांडला आहे. दरम्यान, नोंदणीसाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत आहे.

इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. केंद्र शासनाच्या “एनएसपी’ पोर्टलवर अर्ज नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. मुस्लीम, बौद्ध, जैन, ख्रिश्‍चन, शीख, पारसी या धर्मियांसाठी 2 लाख 85 हजार 451 एवढा कोटा आहे.

चालू शैक्षणिक वर्षात नवीन व नूतनीकरणाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रक्रिया सुरु आहे. यासाठी 5 लाख 63 हजार 412 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. सुमारे 80 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. दरवर्षी नवीन विद्यार्थ्यांकडून पाच लाखांपर्यंतची नोंदणी होते.

यंदा करोना संकट आणि शाळा बंद असल्याने बहुसंख्य विद्यार्थ्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही. त्यांचीही नोंदणी व्हावी यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.