#live: पंतप्रधान मोदींची पुण्यातील सभा

पुणे- राज्य विधानसभा निवडणुकीचे मतदान चार दिवसांवर येऊन ठेपल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून राज्याच्या कानाकोपऱ्यात जाहीर सभा घेत आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज पुण्यनगरीत सभा आयोजित करण्यात आली आहे.

मोदींच्या सभेतील ठळक मुद्दे 

जितकी मोठी अर्थव्यवस्था असेल, तेवढ्याच गतीने आपण गरिबीला मागे टाकू शकतो

देशातील तरुणांवर माझा पूर्ण विश्वास आहे

पुढील ५ वर्षांत पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी रुपये खर्च करणार

गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते निर्णय घेणार आहे

जागतिक स्तरावरील उद्योजक भारतात येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत

संपूर्ण जगात भारताचा डंका वाजतोयः पंतप्रधान मोदी

१३० कोटी भारतीयांमुळेच जगात भारताचं नाव आदरानं घेतलं जातंय

कलम ३७० मुळे नव्या बदलाची सुरुवातः पंतप्रधान मोदी

नवा भारत हा कुणाला घाबरणारा भारत नाहीः

देशासह जागतिक स्तरावर आर्थिक स्थिती घसरली आहेः मोदी

पुणे देशाला संस्कारही देते आणि स्टार्टअपही देतेः मोदी

लोकमान्य टिकळांनी स्वराज्यासाठी प्रयत्न केले,आम्ही सुराज्यासाठी प्रयत्न करतोयः

प्रत्येक निवडणुकीत पुण्याने भाजपला भरभरून दिलंः पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील सभेला सुरुवात

Leave A Reply

Your email address will not be published.