Shubman Gill Hits Double Century : भारत आणि न्यूझीलंड संघांत पहिला वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात युवा फलंदाज शुभमन गिलने 49 व्या षटकात सलग तीन षटकार लगावत आपले द्विशतक पूर्ण केले. 149 चेंडूत 208 धावा केल्या. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा जगातील आठवा फलंदाज ठरला आहे.
वनडे क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा गिल हा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. वयाच्या 23 व्या वर्षी त्याने हा पराक्रम केला. यापूर्वी हा विक्रम इशान किशनच्या नावावर होता, ज्याने वयाच्या 24 व्या वर्षी बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले होते. Team India कडून वनडेत द्विशतक झळकावणारा शुभमन गिल हा पाचवा तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आठवा फलंदाज ठरला आहे.
याआधी एकदिवसीय सामन्यामध्ये सचिन तेंडुलकर ,वीरेंद्र सेहवाग ,रोहित शर्मा ,क्रिस गेल,मार्टिन गप्टिल, फखर जमान, ईशान किशन यांनी द्विशतके झळकावली आहेत. विशेष म्हणजे वनडेत द्विशतक झळकावणाऱ्याच्या यादीत पाच भारतीय खेळाडू आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ODI मध्ये द्विशतके झळकावणारे फलंदाज खालीलप्रमाणे –
1.सचिन तेंडुलकर 200* ( SA, 2010)
2. वीरेंद्र सेहवाग 219 (WI,2011)
3. रोहित शर्मा 209 (AUS, 2013)
4. रोहित शर्मा 264 (SL,2014)
5. क्रिस गेल 215 (ZIM ,2015)
6. मार्टिन गप्टिल 237* (WI, 2015
7. रोहित शर्मा 208* (SL,2017)
8. फखर जमान 210* (ZIM, 2018)
9. ईशान किशन 210 (BAN,2022)
10. शुभमन गिल 208 (NZ, 2023)
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर तीन द्विशतकं आहेत. वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात पहिलं द्विशतक झळकावण्याचा मान मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकरकडे जातो.