Praniti Shinde on Satpute । सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यावर महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी ट्विट करून राम सातपुते यांचे सोलापूर लोकसभा निवडणुकीच्या मैदानात स्वागत केले. त्यासोबत त्यांनी सोलापूरची निवडणूक ‘भूमिपुत्र विरुद्ध उपरे’ असे केल्याची चर्चा आहे.
‘बीडचं पार्सल परत पाठवूया’ Praniti Shinde on Satpute ।
राम सातपुते यांना सोलापूरमधून भाजपची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांचे समर्थक सोशल मीडियावर सक्रीय झालेत. सातपुते यांच्या विरोधात पोस्ट देखील केल्या जातायेत. ज्यात ‘चला लागा कामाला, बीडचा पार्सल बीडला परत पाठवूया’ अशा पोस्टकरण्यात येतायेत. त्यामुळे सोलापुरच्या निवडणुकीत ‘भूमिपुत्र विरुद्ध उपरे’ असा थेट प्रचाराचा मुद्दा निर्माण होण्याची शक्यता आहे. तर, याला राम सातपुते समर्थक कसे उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. Lok Sabha Election 2024
दरम्यान, या अगोदर राम सातपुते यांच्या उमेदवारीवर मत व्यक्त करताना प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे की, “सोलापूर हे कायमच बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्मसमभाव मानणारं शहर आणि जिल्हा असून इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते. मग तो इथला असो किंवा बाहेरचा, सोलापूरची लेक म्हणून मी तुमचं सोलापुरात स्वागत करते, अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना उपरोधिक टोला लगावला आहे.
सोलापुरात राजकीय धुळवड सुरू Praniti Shinde on Satpute ।
तसेच पुढील 40 दिवसात लोकांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे याचं भान राखून, लोकशाहीचा आदर करत, आपण विचारांची लढाई लढत एकमेकांविरुद्ध उभे राहू आणि समाजात फूट न पाडता, समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करु शकतो यावर लढाई लढू, अशी फटकेबाजीही त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून सातपुतेंवर केली आहे. तसेच ही निवडणूक लोकशाहीच्या मार्गाने लढवू या आणि सशक्त लोकशाहीची चुणूक दाखवूया असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते यांना आव्हान दिले आहे. या आव्हानाला आता राम सातपुते कसे उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.