Pritam Munde । देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. मात्र त्याच्या भगिनी विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना पक्षाकडून उमेदवारी दिली नाही. कारण पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यासाठी प्रीतम मुंडे यांना आपली जागा सोडावी लागली. मात्र, घडामोडी घडत असताना प्रीतम मुंडे यांना पक्षाकडून संधी देण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. आगामी विधानसभा निवडणुकीत प्रीतम मुंडे याना शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी जोर धरू लागलीय.
प्रीतम मुंडे यांनी शेवगाव-पाथर्डी विधानसभा लढवावी Pritam Munde ।
पंकजा मुंडे यांनी शेवगाव-पाथर्डीमधून विधानसभा लढवावी, अशी अनेक वेळा मागणी झाली होती. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपनं उमेदवारी दिली. ता प्रीतम मुंडे यांच्याही नावाची चर्चा होत आहे. जर प्रीतम मुंडे यांना शेवगाव-पाथर्डीतून लढण्याची इच्छा असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांनी शेवगाव-पाथर्डीतून निवडणूक लढवावी, अशी माझी भूमिका आहे, असं भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिव अरुण मुंढे यांनी म्हंटलं आहे.
…तर त्यांना निवडून आणू; कार्यकर्त्यांचा आग्रह Pritam Munde ।
शेवगाव-पाथर्डी विधानसभेच प्रतिनिधित्व भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे या करतात. मोनिका राजळे यांच्या विजयात मुंडे कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात वंजारी समाजाचा मतदार मोठ्या संख्येनेआहे. त्यामुळे मुंडे कुटुंबाचा या मतदारांवर मोठा प्रभाव आहे. त्यातच आता भाजपमधीलच काही पदाधिकाऱ्यांनी प्रीतम मुंडे यांनी पाथर्डी-शेवगाव मधून उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणू असं म्हटलं आहे.
दरम्यान, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या पंकजा मुंडे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आताच या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही. माझ्या शेजारी शेवगाव-पाथर्डीच्या आमदार बसलेल्या आहेत, त्यांचं टेन्शन वाढवण्याचं कारण नाही. पुनर्वसन हा विषय त्यांच्यासाठी असतो, जो एखाद्या गोष्टींनं ग्रस्त असतो.मात्र आम्ही कोणत्याही गोष्टीनं ग्रस्त नाहीये, असं म्हंटलं आहे.