Kajol Gets Epic Reply From Nysa Devgn प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री काजोलने तिच्या चित्रपटांनी लोकांच्या मनावर जबरदस्त छाप सोडण्यात कोणतीही कसर सोडली नाही. काजोल तिच्या चित्रपटांसाठी तसेच तिच्या स्पष्टवक्ता स्वभावासाठी ओळखली जाते.
अलीकडेच काजोलने लेक न्यासा देवगणला अॅटिड्युड बदल्याण्याचा सल्ला दिला आहे. काजोलने आपल्या मुलीला कसे वागायचे बोलायचे याबाबत शिकवण्याचा प्रयत्न केला, ज्याला न्यासाने तिच्या आईला असे उत्तर दिले. काजोल अन् अजय देवगणची लेक न्यासा ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध आणि लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. तिच्या प्रत्येक हालचालींवर चाहत्यांचे लक्ष असते. अलीकडे, स्टारकिड तिच्या लूकमुळे चर्चेत राहिली. अनेकदा न्यासा मीडिया आणि पापाराझींसमोर गप्प राहते. पण, न्यासा कॅमेऱ्याच्या मागे कशी आहे, याचा खुलासा स्वतः काजोलने केला आहे.
काजोलने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सांगितले की, ‘तिने तिच्या मुलीला तिची वागणूक सुधारण्याचा सल्ला दिला होता, ज्याला तिच्या मुलीने जोरदार उत्तर दिले. काजोलने या संदर्भात लिहिले आहे की,”मी माझ्या मुलीला तिचा अॅटिड्युड बदलण्यास सांगितले, मग तिने माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, “ज्यांना वृत्तीबाबत तक्रारीचा संबंध आहे, त्यांनी निर्मात्याशी बोलले पाहिजे.” आपल्या मुलीचे कौतुक करताना काजोल लिहिते – ‘वेल प्लेड.’ न्यासाच्या या उत्तराने काजोल खूपच प्रभावित झाली.”
यातून आणखी एक गोष्ट समोर येते की आई काजोलप्रमाणेच न्यासाही खूप विनोदी आहे आणि तिची विनोदबुद्धीही खूप मजबूत आहे. काजोलने आधीच मुलगी न्यासाच्या विनोदबुद्धीची प्रशंसा केली आहे.