पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे आजचे स्मार्ट बुलेटिन…
1. निर्भया प्रकरणातील दोषींना माफी द्यावी
ज्येष्ठ विधिज्ञ इंदिरा जयसिंह यांचे आवाहन2. दोषींना माफी द्या बोलण्याची हिंमत कशी होते
निर्भयाच्या आई आशादेवी यांचा दोषींना माफी न देण्याचा निर्णय3. शाहीन बागमध्ये होणाऱ्या रस्त्याच्या अडचणीवर तोडगा काढा
दिल्ली उच्च न्यायलयाचे पोलिसांना आदेश4. राहुल गांधींना खासदार म्हणून निवडणं हा केरळवासियांचा विनाशकारी निर्णय होता
इतिहासकार रामचंद्र गुहा यांची राहुल गांधी यांच्यावर टीका5. देशात दोन मुलंच जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा आवश्यक आहे
सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य6.संघाच्या नसबंदीच्या इच्छेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायदा आणावा
मोहन भागवत यांच्या वक्तव्याला नवाब मलिक यांचे उत्तर7. जगातील सर्वात लहान बटूमुर्तीचे निधन
मागील काही दिवसांपासून खग्रेंद्र थापा यांच्यावर न्युमोनियाचे उपचार होते सुरू8. केंद्राने मदत दिली नाही तरी आम्ही झुकणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य9. शिर्डी बंदला परिसरातील 25 गावांचा पाठींबा
साईबाबांच्या जन्मस्थळावरुन पुन्हा एकदा वाद10. मी कधीही तुकडे-तुकडे गॅंगचे समर्थन करणार नाही
अभिनेत्री कंगना राणावतने काढला दीपिका पदुकोणला चिमटा