होबार्ट : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची युक्रेनची साथीदार नादिया किचेनोक यांनी हाॅबर्ट आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
Straight sets win 🤩
Nadiia Kichenok and @MirzaSania are your @HobartTennis Doubles Champions after defeating Peng/Zhang, 6-4, 6-4! pic.twitter.com/5rzrRbWcJp
— wta (@WTA) January 18, 2020
सानिया-नादिया या जोडीने महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत चीनच्या व्दितीय मानांकित शुवाई पेंग आणि शुवाई झांग जोडीचा ६-४, ६-४ असा पराभव करत विजेतेपद आपल्या नावे केले. ही लढत १ तास २१ मिनिटे चालली. सानियाचे कारकिर्दीतील डब्ल्यूटीए दुहेरीचे हे ४२ वे विजेतेपद ठरले.
Nadiia Kichenok and @MirzaSania advance to the @HobartTennis doubles final!
They defeat Zidansek and Bouzkova 7-6(3), 6-2. pic.twitter.com/mW1cFFraCx
— wta (@WTA) January 17, 2020
दरम्यान, शुक्रवारी सानिया-नादिया जोडीने उपांत्य फेरीच्या सामन्यात स्लोवेनियाच्या तमारा जिदानसेक आणि चेक गणराज्यच्या मेरी बाउजकोव या जोडीचा ७-६, ६-२ असा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता.