पुणे – पर्वती विधानसभा मतदारसंघामधील प्रभात 28 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बुथ अभियानाची सुरूवात करण्यात आली. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. भाजपचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, समर्थ बुथ अभियान विभाग संयोजक योगेश बाचल,नगरसेवक धनराज घोगरे यावेळी उपस्थित होते.
या वेळी सर्व बुथप्रमुख,शक्ति केंद्र प्रमुखांचा नाम फलक, संपर्कासाठी केंद्र सरकारच्या, पुणे मनपाच्या योजना,अद्यावत मतदार यादी,भौगोलिक रचना असलेला स्मार्ट फोन महापौरांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना देण्यात आले.
माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे संयोजन प्रभाग समिती सदस्य रमेश बिबवे,गणेश शेरला,सतिश काळे यांनी केले.