लोणावळा – मुंबई पुणे लोहमार्गावर मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या खंडाळा घाटात ठाकूरवाडी ते मंकीहील सेक्शन मध्ये मंकीहील येथे किलोमीटर क्रमांक ११५/८-१० जवळ एक मोठी दरड रेल्वेच्या ट्रॅकवर कोसळली आहे. शुक्रवारी मध्यरात्री १२.३० ते १.३० वाजण्याच्या दरम्यान सदरची घटना घडली आहे .
या दरडीमुळे रेल्वेची डाऊन आणि मिडल लाईन पूर्णतः मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याने वाहतुक पूर्ण पणे बंद झाली. यामुळे मुंबई कडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. दरम्यान, लोहमार्गावरील दरड हटवण्याचे काम रेल्वे प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर सुरु आहे.