पाटणा – राष्ट्रीय जनता दल पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यावर सिंगापुर मध्ये आज किडनीरोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. (Lalu Prasad Yadav’s kidney transplant successful) ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती त्यांचे पुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिली.
लालूंची कन्या रोहिणी आचार्य यांनी लालूंना किडनी दिली आहे. तिच्यावरचे ऑपरेशनही यशस्वी झाले आहे. त्यानंतर ही किडनी लालूंना बसवण्यात आली. तेही ऑपरेशन यशस्वी झाल्याचे तेजस्वी यादव यांनी नमूद केले.
पापा का किडनी ट्रांसप्लांट ऑपरेशन सफलतापूर्वक होने के बाद उन्हें ऑपरेशन थियेटर से आईसीयू में शिफ्ट किया गया।
डोनर बड़ी बहन रोहिणी आचार्य और राष्ट्रीय अध्यक्ष जी दोनों स्वस्थ है। आपकी प्रार्थनाओं और दुआओं के लिए साधुवाद। 🙏🙏 pic.twitter.com/JR4f3XRCn2
— Tejashwi Yadav (@yadavtejashwi) December 5, 2022
74 वर्षीय लालू हे गेल्या काहीं दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे निदान करण्यात आल्यानंतर ही किडनी रोपण शस्त्रक्रिया करणे गरजेचे बनले होते. त्यासाठी त्यांची कन्या रोहिणी आचार्य यांची किडनी चांगली सूट होत असल्याचे निदर्शनाला आल्यानंतर तिनेही राजीखुषीने वडिलांसाठी किडनी दान करण्याचा निर्णय घेतला होता.
आपले वडिल आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्यासाठी मी कसलाही त्याग करायला तयार आहे असे रोहिणी आचार्य यांनी ट्विटरवर म्हटले होते.