Arrest Warrant Against Lalu Yadav| देशभरात लोकसभा निवडणूकींचे वारे वाहू लागले आहे. सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. असे असतानाच बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ग्वाल्हेर कोर्टाने बेकायदेशीरपणे शस्त्रास्त्र खरेदी-विक्रीच्या 26 वर्षे जुन्या प्रकरणात त्यांच्याविरुद्ध हे वॉरंट जारी करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण? Arrest Warrant Against Lalu Yadav|
1995 आणि 1997 मध्ये बनावट फॉर्म क्रमांक 16 तयार करून शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या अटकेचे वॉरंट जारी करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधील व्यापारी राजकुमार शर्मा यांनी ग्वाल्हेरच्या तीन शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
राजकुमारने 1995 ते 1997 दरम्यान या कंपन्यांकडून शस्त्रास्त्रे आणि काडतुसे खरेदी केल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर राजकुमार शर्माने ही शस्त्रे आणि काडतुसे बिहारमधील लालू प्रसाद यादव आणि इतरांना विकली. हे प्रकरण 26 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित आहे.
याआधी या प्रकरणात न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना 1998 पासून फरार घोषित केले होते. बिहारमध्ये 23 ऑगस्ट 1995 ते 15 मे 1997 या कालावधीत शस्त्रास्त्रांची ही अवैध खरेदी-विक्री झाल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यासह एकूण 22 जणांना आरोपी करण्यात आले आहे. यात दोन आरोपींचा मृत्यू झाला असून सहा जणांविरुद्ध खटला सुरू आहे. त्याचबरोबर या प्रकरणात लालू प्रसाद यादव यांच्यासह 14 आरोपींना फरार घोषित करण्यात आले आहे.
मूली थोड़े हैं कि उखाड़ के फेंक दोगे।
लालू प्रासाद यादव नाम है। इस बुढ़ापे में भी तुम्हारा काल बनकर चट्टान की भाँति खड़ा हूँ, अपने उसूलों पर अड़ा हूँ। pic.twitter.com/fIfcwRftrU
— Rofl Lalu (@Rofl_Lalu) April 5, 2024
लालू प्रसाद यादव यांचे ट्वीट चर्चेत Arrest Warrant Against Lalu Yadav|
याप्रकरणानंतर लालू प्रसाद यादव यांची ही प्रतिक्रिया X वर दिली आहे. त्यांनी एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करत पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ”मूली थोड़े हैं कि उखाड़ के फेंक दोगे. लालू प्रसाद यादव नाम है. इस बुढ़ापे में भी तुम्हारा काल बनकर चट्टान की भांति खड़ा हूं, अपने उसूलों पर अड़ा हूं,” असा इशारा दिला आहे.
हेही वाचा: