Amitabh Bachchan : ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो मागील काही वर्षांपासून बॉलीवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट करत आहेत. या शोमुळे त्यांना प्रसिद्धी आणि प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले. अमिताभ बच्चन यांनी आपल्या होस्टिंगद्वारे चाहत्यांच्या हृदयात स्थान टिकवून ठेवले आहेत. नुकताच KBC 15 चा शेवटचा एपिसोड 29 डिसेंबर रोजी टेलिकास्ट झाला. या सिझनचा हा शेवटचा एपिसोड असल्याने अमिताभ बच्चन भावूक झाल्याचे पाहायला. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सोनी टीव्हीच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या क्लिपमध्ये अमिताभ बच्चन म्हणतात, ‘देवियो और सज्जनो, आता मी जातोय आणि उद्यापासून हा मंच नसेल. हे आपल्या प्रिय माणसांना सांगणं खूप अवघड असतं आणि ही सांगायची आपली इच्छाही नसते. मी अमिताभ बच्चन या सिझनमध्ये या मंचावरुन शेवटचं बोलतोय शुभ रात्री!’ असे बोलून ते हात जोडून प्रेक्षकांचे आभार मानतात. तेव्हा त्यांच्या डोळयातून अश्रु येतात. यादरम्यान प्रेक्षक देखील भावूक झाल्याचे दिसते.
View this post on Instagram
18 एप्रिल 2023 रोजी ‘कौन बनेगा करोडपती’ च्या 15 व्या सिझनला सुरुवात झाली होती. अनेक सामान्य लोक या शोमध्ये येऊन लखपती तर कोणी करोडपतीही झाले. यात अनेक सेलीब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. यात त्यांनी अनेक गोष्टींबाबत खुलासा करत मजेशीर किस्से देखील सांगितले. यंदाच्या शोमध्ये 21 वर्षीय जसकरण सिंग या सीझनचा पहिला करोडपती बनला आहे. तर किड्स स्पेशलमध्ये 12 वर्षांचा मयंकही कमी वयात करोडपती झाला. अमिताभ यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, बिग बी प्रभासच्या पुढील चित्रपट कल्की 2898 मध्ये दिसणार आहेत, ज्याचे नाव आधी प्रोजेक्ट के होते.