चिंबळी- कुरुळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या इमारत बांधकामाची पहणी परदेशी पाहुण्यांनी केली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी “प्लॅस्टीक बंदी’बाबत इंग्रजीमधून नाट्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत केले. हे नाट्य पाहून परदेशी पाहुणे भाराऊन गेले होते.
या बांधाकामासाठी अटीस कन्व्हअर्स कंपनी लि.यांच्या वतीने सीआरएस फंडातून 12 लाख रूपये रूपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पाहणीप्रसंगी कंपनीचे युस रॅपेल, एस. के. अंबास्टा, संतोष रणवरे यांचे शाळा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, मुख्याध्यापिका शोभा सुतार, माजी सरपंच बाळासाहेब सोनवणे, सरपंच सचिन कड आदि मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एम. के. सोनवणे, देवराम सोनवणे, मल्हाली बागडे, किशोर बागडे, संतोष घाडगे, संतोष दुर्गले आदी मान्यवर उपस्थित होते.