महाळुंगे इंगळे- अमरावती विभागस्तरीय कबड्डी स्पर्धेत भोसे येथील खुशी नितीन कुटे हिने विशेष प्राविण्य मिळविल्याने मुंबई येथे ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धसाठी तिची निवड झाली आहे. त्यामुळे भोसेकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मयुर कुटे पाटील यांच्या हस्ते खुशीचा सत्कार करण्यात आला.
खडतर परिस्थितीवर जिद्दीने मात करत खुशीने हे अतुलनीय यश संपादन केले असून, यासाठी तिला भगवान सोनवणे, रमेश लोणारी, इक्बाल खान व रोहन सावंत आदींचे मार्गदर्शन लाभले. तर तिची राज्यस्तरावर निवड झाल्याने तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.