John Abraham fitness mantra : अभिनेता जॉन अब्राहम बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. सगळ्यांनाच त्याच्यासारख्या शरीरयष्टीचे वेड लागले आहे. वयाच्या 51 वर्षीही जॉन तरुण आणि फिट दिसत आहे. अशा परिस्थितीत जॉनच्या चाहत्यांमध्ये त्याची जीवनशैली काय आहे? जी त्याला या वयातही तरुण ठेवते आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आज आपण हॅण्डसम हंक जॉन अब्राहमचे फिटनेस रहस्य उघड करणार आहोत. ज्यामध्ये अभिनेता आपल्या शरीराची कशी काळजी घेतो याबद्दल जाणून घेणार आहोत….
25 वर्षांपासून साखर खाल्ली नाही
खरं तर, अलीकडेच झोया अख्तरचा आगामी चित्रपट ‘लक बाय चान्स’मध्ये जॉन अब्राहमसोबत काम करणारी पाकिस्तानी-ब्रिटिश अभिनेत्री एली खानने जॉनच्या शिस्तबद्ध जीवनशैलीचे कौतुक केले आहे.एलीने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जॉन त्याच्या भूमिकेसाठी खूप वचनबद्ध आहे. तो संतांप्रमाणे जीवन जगतो.
त्यामुळेच तो चित्रपटसृष्टीत यशस्वी ठरला आहे. यावेळी मुलाखतीत तिच्यासोबत उपस्थित असलेली एलीची पत्नी चांदनी हिने जॉनच्या फिटनेसबद्दल सांगितले की, जॉनने गेल्या 25 वर्षांपासून साखरेला स्पर्शही केलेला नाही. त्याच्या शिस्तबद्ध आहारामुळे तो वयाच्या 51व्या वर्षीही तरुण आणि तंदुरुस्त दिसतो.
दारू आणि सिगारेट पासून लांबच
त्याचबरोबर एली खानने सांगितले की, जेव्हा मी जॉन अब्राहमला विचारले की, तुमच्यासाठी विष काय आहे? तो गोड म्हणाला. मी विचारले, दारू आणि सिगारेट? त्यामुळे त्याचे उत्तर आले… हे मी कधीच चाखले नाही आणि या पासून लांबच राहिलो. एली पुढे सांगते की, जेव्हा मी पुन्हा विचारले की हे शरीर मांस आणि प्रथिनेपासून बनलेले आहे का? तेव्हा त्याचे उत्तर होते की, मी पूर्ण पणे शाकाहारी आहे. असं ती यावेळी म्हणली.
आहारातील योग्य संतुलन
आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जॉन अब्राहमने आपल्या आहारात शाकाहारी पदार्थांचे समान संतुलन ठेवले आहे. त्याला रात्रीचे जेवण 9 वाजण्यापूर्वी खायला आवडते, जेणेकरून तो 9.30 पर्यंत झोपू शकेल आणि पहाटे 4.30 वाजता उठू शकेल. जॉन त्याच्या आहारासोबतच व्यायामही करतो.
जॉनचे वर्कआउट सत्र दोन भागांमध्ये विभागले गेले आहेत. एक प्रमुख आणि एक लहान आहे. यामुळे तो अधिकाधिक बॉडीबिल्डिंग करतो. जॉन एका दिवसात त्याच्या शरीराच्या दोन भागांवर काम करतो. तो आठवड्यातून चार दिवस व्यायाम करतो आणि दोन दिवस विश्रांती घेतो.
जॉन अब्राहम सायकलिंग, धावणे, डंबेलसह व्यायाम, पायांचे व्यायाम तसेच फुटबॉलसारखे खेळ करून तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करतो. जॉन अब्राहमने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘त्याने 27 वर्षांपासून त्याची आवडती गोड मिठाई नाही. शिल्पा शेट्टीच्या शेप ऑफ यू या शोमध्ये बोलताना त्याने सांगितले की, ‘त्याला काजू कतली आवडते, पण त्याने 27 वर्षांपासून ती खाल्ली नाही’.