अनुष्का शर्मा सिनेसृष्टी आणि देशापासून जाणार दूर? विराटच्या व्हिडिओनंतर चर्चांना उधाण

Anushka Sharma| अभिनेत्री अनुष्का शर्मा वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. नुकतेच ती दुसऱ्यांदा आई झाली आहे. लंडनमध्ये दुसरा मुलगा अकायला तिने जन्म दिला. त्यानंतर ती सध्या सिनेसृष्टीपासून दूर आहे. यात आता अनुष्काचा पती भारतीय क्रिकेटर विराट कोहलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यातील त्याने केलेल्या विधानानंतर अनुष्का सिनेसृष्टीला रामराम करत लंडनमध्ये शिफ्ट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
विराट कोहली सध्या ‘आयपीएल’मध्ये व्यस्त आहे. त्यादरम्यान त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात तो रिटायरमेंटनंतर मुलांना घेऊन परदेशात शिफ्ट होणार असल्याचे सूचक विधान करत आहे. या व्हिडीओनंतर अनुष्का शर्माही पती आणि मुलांसोबत परदेशात शिफ्ट होणार असल्याचे म्हंटले जात आहे.
Virat Kohli said, “as a sportsman, we do have an end date to our career.I can’t keep playing forever. I’m sure I won’t have any regrets left. I’ll give my all till I’m playing, but once I’m done, I’ll be gone, you won’t see me for a while 😢#ViratKohli
— Khabri_Prasang (@Prasang_) May 16, 2024
विराट कोहली व्हिडिओमध्ये म्हणतो की, “एक खेळाडू म्हणून आमच्या करिअरमध्ये एक एक्सपायरी डेट असते. मी पाठिंबा देण्याचं काम करत आहे. मी सातत्याने खेळू शकत नाही. मला कधीही पश्चाताप होणार नाही. जोपर्यंत मी खेळतोय तोपर्यंत मी शंभर टक्के देईल. पण एकदाचा खेळून मी काही दिवसांसाठी गायब होऊ शकतो.”
विराट कोहलीच्या या व्हायरल व्हिडीओनंतर अनुष्का शर्माही आपल्या मुलांसोबत परदेशात शिफ्ट होणार असल्याचं म्हटले जात आहे. त्यामुळे ती सिनेसृष्टीला कायमचा रामराम करणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप याबाबत दोघांनीही कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
हेही वाचा:





