कृती सेननने टायगर श्रॉफबरोबर “हिरोपंती’मधून ऍक्टिंग करिअरला सुरुवात केली होती. आता टायगर श्रॉफ आणि कृती सेनन पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. टायगर श्रॉफचा आगामी सिनेमा “गणपत- पार्ट 1′ मध्ये कृती सेनन लीड रोल करणार आहे. या नव्या ऍक्शनपटाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. त्याबरोबरच कृती सेननच्या लीड रोलबाबतची माहिती उघड केली गेली आहे.
स्वतः कृती सेनननेही टायगर श्रॉफबरोबर पुन्हा काम करायला मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “गणपत’चे शुटिंग सुरू होण्याची तिला प्रतिक्षा आहे. “गणपत’मध्ये कृतीच्या व्यक्तिरेखेचे नाव जस्सी असे असणार आहे. टायगर श्रॉफच्या बरोबरीने ती जोरदार ऍक्शन सीन करणार आहे. सुसाट मोटरसायकल चालवणार आहे आणि भन्नाट स्टंटही करणार आहे. मोशन पोस्टरमध्येही कृती मोटरसायकलवर बसलेलीच दिसते आहे.
बऱ्याच दिवसांपासून कृतीला ऍक्शन रोल करण्याची इच्छा होती. ‘गणपत’च्या निमित्ताने तिची ही इच्छा पूर्ण झाली आहे. बॉलिवूडमध्ये ऍक्शन हिरोईन हा ट्रेन्ड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न काही हिरोईननी केला आहे. मात्र त्यात विशेष यश आले नव्हते. त्या दृष्टीने कृती सेननचा हा नवीन प्रयत्न टायगर श्रॉफच्या तोडीचाच ठरेल, अशी आशा आहे.