शिचीयान – भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू व स्टार खेळाडू किदाम्बी श्रीकांत यांनी येथे सुरू असलेल्या कोरियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे महिला व पुरुष एकेरीत विजयी सलामी देताना दुसरी फेरी गाठली.
सिंधूने अमेरिकेच्या लॉरेन लॅमचा 21-15, 21-14 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. श्रीकांतने मलेशियाच्या डॅरेन लियुवर 22-20, 21-11 असा विजय मिळवला. आता दुसऱ्या फेरीत सिंधूची लढत जपानच्या आया ओहोरीशी होणार आहे.
श्रीकांतचा या फेरीतील सामना इस्रायलच्या मिशा जील्बरमनशी होणार आहे. या स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी या जोडीने यजमान कोरियाच्या तेइ यांग शीन व वांग चॅन या जोडीवर 21-16, 21-15 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली.