Australian Open 2024 : भारतीय खेळाडू सुमित नागलचे ऑस्ट्रेलियन ओपन 2024 मधील आव्हान संपुष्टात आले आहे. दुसऱ्या फेरीत सुमितला चीनच्या शांग जुंचेंगकडून 6-2, 3-6, 5-7, 4-6 असा पराभव स्वीकारावा लागला. दोन्ही खेळाडूंमधील हा पुरुष एकेरीचा सामना 2 तास 50 मिनिटे चालला.
गुरुवारी (18 जानेवारी) कोर्ट क्रमांक 13 वर खेळल्या गेलेल्या सामन्यात सुमित नागलची सुरुवात चांगली झाली आणि त्याने पहिला सेट सहज जिंकला. मात्र, यानंतर चीनच्या खेळाडूने जबरदस्त पुनरागमन केले. दुसऱ्या सेटच्या चौथ्या गेममध्ये शांगने सुमितची सर्व्हिस तोडली. यानंतर चीनच्या खेळाडूने दुसरा सेट सहज जिंकला. त्यानंतर सुमितला तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्येही पुनरागमन करता आले नाही आणि त्याने सामना गमावला.
What an atmosphere on Court 13!
Jungcheng Shang advances to the third round of a Grand Slam for the first time in his career, defeating a gallant Sumit Nagal 2-6 6-3 7-5 6-4 🙌#AusOpen #AO2024 pic.twitter.com/GM3AyqUk0W
— #AusOpen (@AustralianOpen) January 18, 2024
सुमित नागलने पहिल्या फेरीत कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बुबलिकचा पराभव करून इतिहास रचला होता. सुमितने या स्पर्धेत 31व्या मानांकित अलेक्झांडर बुब्लिकचा पराभव केला होता. सुमित नागलने हा सामना 6-4, 6-2, 7-6 (5) असा जिंकला. 35 वर्षात भारतीय पुरुष टेनिसपटूने एकेरी ग्रँडस्लॅममध्ये सीडेड खेळाडूचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ होती. सुमित नागलने स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या अंतिम फेरीत अॅलेक्स मोल्कन (स्लोव्हाकिया) याचा 6-4, 6-4 असा पराभव करून मुख्य ड्रॉ गाठला.
What an atmosphere on Court 13!
Jungcheng Shang advances to the third round of a Grand Slam for the first time in his career, defeating a gallant Sumit Nagal 2-6 6-3 7-5 6-4 🙌#AusOpen #AO2024 pic.twitter.com/GM3AyqUk0W
— #AusOpen (@AustralianOpen) January 18, 2024
सुमित नागलने 2019 मध्ये यूएस ओपनमध्ये रॉजर फेडररविरुद्ध ग्रँड स्लॅम पदार्पण केले होते. त्याने फेडररला एका सेटमध्ये पराभूत केले पण सामना 6-4, 1-6, 2-6, 4-6 असा गमावला होता. यूएस ओपन 2020 च्या पहिल्या फेरीतही त्याने अमेरिकेच्या ब्रॅडली क्लहानचा 6-1, 6-3, 3-6, 6-1 असा पराभव केला होता.