BWF Swiss Open 2024 : ऑलिम्पिक पदक विजेते पी.व्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि किदाम्बी श्रीकांत यांनी बुधवारी स्वित्झर्लंडमधील बासेल येथील सेंट जेकोबशाले एरिना येथे विजय मिळवून स्विस ओपन 2024 च्या दुसऱ्या फेरीत (प्री-क्वार्टर फायनल) प्रवेश केला.
जागतिक क्रमवारीत 11व्या क्रमांकावर असलेल्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतीय महिला बॅडमिंटनपटू सिंधूने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत 43व्या क्रमांकावर असलेल्या थायलंडच्या पोर्नपिचा चोएकीवोंगचा 34 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-12, 21-13 असा पराभव केला.
पहिल्या गेममध्येच पीव्ही सिंधूने सुरुवातीपासूनच आपली आघाडी कायम राखली आणि सहज विजय मिळवला. खेळाच्या सुरुवातीपासूनच तिने थायलंडच्या खेळाडूला कडवी टक्कर दिली. 15-8 अशी आघाडी घेतल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटूने आपला शानदार खेळ सुरू ठेवत पहिला गेम 21-12 असा जिंकला.
विजयी वाटचाल करताना सिंधूने दुसऱ्या गेममध्येही पोर्नपिचावर वर्चस्व राखले आणि आघाडी घेतली, परंतु पोर्नपिचा चोकिवाँगने लवकरच पुनरागमन करत गुणसंख्या 9-9 अशी बरोबरी केली. यानंतर पीव्ही सिंधुनं 16-11 अशी आघाडी घेतली आणि थायलंडच्या खेळाडूला सामना निर्णायकापर्यंत नेण्याची कोणतीही संधी दिली नाही आणि तिने दुसरा गेम 21-13 असा जिंकला.
लक्ष्य सेनची आगेकूच….
याशिवाय पुरुष एकेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत 13व्या क्रमांकावर असलेल्या लक्ष्य सेनने मलेशियाचा बॅडमिंटनपटू लिओंग जुन हाओचा 21-19, 15-21, 21-11 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना कडवी टक्कर दिली, मात्र सातव्या मानांकित लक्ष्यने आपल्या दमदार फटक्यांच्या जोरावर विजय मिळवला.
श्रीकांतची दुसऱ्या फेरीत धडक…
अन्य एका सामन्यात किदाम्बी श्रीकांतने चायनीज तैपेईच्या वांग त्झू वेईचा सरळ गेममध्ये पराभव केला. त्याने चायनीज तैपेईच्या शटलरचा 21-17, 21-18 असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
IPL 2024 : एमएस धोनीने CSK चे कर्णधारपद सोडण्यामागे ‘हे’ असू शकते कारण….
दरम्यान, BWF सुपर 300 इव्हेंट स्विस ओपन पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी महत्त्वाचे रँकिंग गुण प्रदान करते. बॅडमिंटनसाठी रँकिंग कालावधी 1 मे 2023 रोजी सुरू झाला आणि पुढील महिन्यात संपेल.