#IPL2019 : राजस्थानविरूध्द कोलकाताला विजय आवश्‍यक

पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेण्याची राजस्थानला संधी

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स
वेळ – रा. 8.00 वा
स्थळ – ईडन गार्डन मैदान, कोलकाता

कोलकाता – आयपीलचा बारावा मोसम आता शेवटाकडे चालला असून अद्याप प्ले ऑफ मधील चार संघ ठरलेले नसल्याने चुरस आणखीनच वाढली असून यंदाच्या मोसमात पहिल्या काही सामन्यांमध्ये आपल्या उत्कृष्ठ कामगिरीने प्रतिस्पर्धी संघांना पराभवाची चव चाखायला लावणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सला लागोपाठ पाच सामन्यांमध्ये पराभवाची चव चाखावी लागल्याने बाद फेरी गाठण्याचे त्यांचे स्वप्न धुळिस मिळण्याची शक्‍यता असून आज होणाऱ्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवत बाद फेरी गाठण्याचे त्यांचे उद्दिष्ट असणार आहे. यावेळी राजस्थानचे आव्हान देखील संपुष्टात आले असून केवळ आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी ते या सामन्यात विजय मिळवण्यास उत्सूक असणार आहेत.

यंदाच्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या दहा सामन्यांपैकी केवळ चार सामन्यांमध्ये विजय मिळवला असून सहा सामन्यांमध्ये त्यांना पराभवाची चव चाखावी लागली आहे. यावेळी कोलकाताने हैदराबाद, पंजाब, बंगळुरू आणि राजस्थान विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला आहे. तर, त्यांना चेन्नई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद यांनी पराभूत केले आहे. सध्या कोलकाताचे आठ गुण झालेले असून त्यांचे आणखीन चार सामने बाकी आहेत. या चार पैकी चारही सामने त्यांनी जिंकल्यास प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणे त्यांच्यासाठी शक्‍य होणार आहे.

तर, दुसरीकडे राजस्थानच्या संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेले आहे. कारण, राजस्थानने आपल्या दहा सामन्यांपैकी केवळ तीन सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर, सात सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेली राजस्थानने मुंबई आणि बंगळुरूयांच्या व्बिरोधातील सामने जिंकले असून पंजाब, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली यांच्या विरोधात पराभव पत्करावा लागला आहे. सध्या राजस्थानचे सहा गुण झालेले असून त्यांनी आगामी चारही सामने जिंकले तरी त्यांना बाद फेरी गाठण्यात अपयश येईल.

प्रतिस्पर्धी संघ –

कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), रॉबिन उथप्पा, क्रिस लिन, आंद्रे रसेल, सुनील नारायन, शुबमन गिल, पियूष चावला, कुलदीप यादव, प्रसिद कृष्णा, शिवम मावी, नितेश राणा, रिंकू सिंह आणि कमलेश नागरकोटी, कार्लोस ब्रॅथवेट, लोकी फर्ग्युसन, एनरिच नॉर्च, निखिल नाइक, हॅरी गर्नी, पृथ्वी राज यारा, जो डेनली, श्रीकांत मुंढे.

राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिर्ला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्‍स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, एश्‍टॉन टर्नर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.