कोल्हापूर : आजऱ्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील हळोली गावात टस्कर हत्तीन प्रचंड धुमाकूळ घातला आहे. या हत्तीनं या परिसरातील शेतीच मोठं नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झालेत. सध्या या गावात भीतीच वातावरण पसरले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज या तालुक्यात हत्तींचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. आजरा आणि चंदगड तालुक्यात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने या परिसरात टस्कर हत्ती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

कोल्हापूर (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील हळोली गावात टस्कर हत्तीन प्रचंड धुमाकूळ घातला आहे.

Posted by Digital Prabhat on Sunday, 26 July 2020

कालच कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातील हळोली गावात टस्कर हत्तीनं प्रचंड धुमाकूळ घातलाय. रात्रीच्या वेळी टस्कर हत्ती हळोली गावात शिरला आणि अख्खी रात्र जागून काढण्याची वेळ गावकाऱ्यांवर आली. या टस्कर हत्तीने भात आणि इतर पिकांचे प्रचंड नुकसान केलं असून नारळ केळीची झाडं जमीनदोस्त केली आहेत.

हळोली सोबतच वेळवट्टी, मासोळी, देवडे या गावांच्या परिसरातही हत्तीने धुमाकूळ घातला आहे. वन विभाग गावापर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार ग्रामस्थां केली असून नुकसान भरपाई नको पण हत्तीला जंगलात घालवा अशी मागणी आजरा भागातील सगळ्या गावकऱ्यांनी केलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.