कोल्हापूर- कोल्हापूर पाटबंधारे विभागानं पंचगंगा नदी आणि भोगावती नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणाच्या सर्विस गेट तांत्रिक काम सुरू असताना हा दरवाजा मधेच अडकल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रवाह भोगावती नदीपात्रात सुरू झाला आहे. दरम्यान पंचगंगा आणि भोगावती नदीकाठच्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पाटबंधारे विभागाचे अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी केला आहे ते कोल्हापुरात बोलत होते.
बांदिवडेकर म्हणाले, राधानगरी धरणाच्या सर्विस गेटचे काम सुरू असताना अचानक दरवाजा मध्ये अडकला आहे. ही घटना सकाळी आठ ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. त्यामुळे धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर ती नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे पंचगंगा आणि भोगावती ची पाणी पातळी ही चार ते पाच फूट आणि अचानक वाढणार असल्याचं बांदिवडेकर यांनी म्हटलं आहे.तांत्रिक काम सुरू असताना हा सगळा प्रकार घडला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसून नसल्याचं पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी सांगितला आहे. दरम्यान गेट पुन्हा बसवण्यासाठी किमान सहा ते सात तासांचा अवधी लागेल असेही त्यांनी म्हटले आहे. कोल्हापूर पाटबंधारे विभागाची टीम राधानगरीला रवाना झाले असल्याचं त्यांनी सांगितल आहे.