कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. मिरवणुकीसाठी प्रशासनाकडून तीन मार्ग उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शहरातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन इराणी खाणीमध्ये करण्यात येणार आहे. पहिल्या दोन तासांमध्ये 50 हून अधिक मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.
कोल्हापूर महापालिकेकडून इराणी खण परिसरात 12 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर तांबट कमान येथेही सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत.
गणेश मूर्ती विसर्जनासाठी इराणी खण येथे 13 तराफे व 4 क्रेनसह 430 हमालांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे हमाल ओळखण्यासाठी त्यांना विशेष रंगाची टोपी व ओळखपत्र देण्यात आले आहे.