Sanjay Mandalika | Shahu Maharaj | Satej Patil : कोल्हापूर लोकसभेला करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शाहू महाराज यांनी कोल्हापूरची उमेदवारी घ्यावी यासाठी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांकडून साद घालण्यात आली होती.
आजवरची घराण्याची परंपरा आणि पुरोगामी वसा लक्षात घेत शाहू महाराजांनी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. तर महायुतीकडून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. । Sanjay Mandalika | Shahu Maharaj | Satej Patil
दरम्यान आता दोघांकडून देखील प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला असून वैयक्तिक पातळीवर टीका होऊ लागली आहे. अश्यातच, आता शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत. ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार आहे, असं वादग्रस्त वक्तव्य संजय मंडलिक यांनी केलं आहे.
ते काल चंदगड तालुक्यातील नेसरी येथील जाहीर सभेमध्ये बोलत होते. मात्र, आता त्यांच्या या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला असून काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
सतेज पाटील म्हणाले की, “उमेदवार संजय मंडलिक यांनी अपमानास्पद वक्तव्य केले असून, शाहू महाराज यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्यावर कुणीही वैयक्तिक टीका करणार नाही, असे वर्तमानपत्रातून सांगितले होते.
पण संजय मंडलिक यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आपला मोठा मताधिक्याने पराभव दिसत असल्यामुळे मंडलिक यांनी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहेत. त्यांनी माफी तर मागितलीच पाहीजे,
पण या वक्तव्याबद्दल कोल्हापूरकर जनता निवडणुकीत त्यांना धडा शिकवेल. मंडलिक यांना कोल्हापूरी बाणा दाखविण्यात येईल, असे प्रत्युत्तर सतेज पाटील यांनी दिले.
संजय मंडलिक यांना पराभव समोर दिसत असल्यामुळे ते निवडणूक वेगळ्या दिशेला घेऊन जात आहेत. मंडलिक यांनी कुस्ती करावी, त्याला कुणाची हरकत नाही. पण खालच्या पातळीची कुस्ती करू नये.
महाराजांबद्दल वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही, हे सार्वजनिकरित्या जाहीर करूनही तुम्ही वैयक्तिक टिप्पणी का करत आहाता? असा सवाल सतेज पाटील यांनी उपस्थित केला.
संजय मंडलिक नेमकं काय म्हणाले ? । Sanjay Mandalika
संजय मंडलिक यांची कोल्हापुरच्या चंदगड तालुक्यातील नेसरी येथे प्रचारसभा पार पडली. या सभेत बोलताना संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती हे खरे वारसदार आहेत का? असा सवाल उपस्थित करत धक्कादायक विधान केले.
त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे. “या मल्लाला हातच लावायचा नाही. मल्लाला टांगच मारायचे नाही मग ती कुस्ती कशी होणार? अशात गादीचा अपमान झाला की काय, असा कांगावा केला जातो.
यानिमित्ताने सांगितले पाहिजे की आत्ताचे महाराज साहेब आहेत हे कोल्हापूरचे आहेत का? वारसदार खरे आहेत का? ते सुद्धा दत्तकच आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच खरी वारसदार,” असे संजय मंडलिक यावेळी म्हणाले. । Sanjay Mandalika | Shahu Maharaj | Satej Patil