-->

कोल्हापूर : इचलकरंजीत मनसे कार्यकर्त्यांकडून महावितरण कार्यालयाची तोडफोड

कोल्हापूर (प्रतिनिधी) – इचलकरंजी शहरातील महावितरणचे कार्यालय मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडले. व्यावसायिक व घरगुती वीज महावितरण कडून कापल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली. सर्व कामकाज चालू असताना अचानकपणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालय पडल्याने मोठा गोंधळ उडाला. सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाचे पूर्णपणे तोडफोड केली. मोठा पोलिस बंदोबस्त महावितरण कार्यालयातवर तैनात करण्यात आला आहे.

काही काही दिवसांपासून महावितरणकडून थकीत वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने शहरातील अनेक घरगुती व व्यावसायिक व ग्राहकांची वीज कनेक्शन कापली आहेत.

मनसेने लॉकडाउन काळातील वीज बिले पूर्णपणे माफ करावेत, अशी मागणी महावितरणकडे केली होती. तरीदेखील वीज कनेक्शन महावितरणने कापल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दुपारी मनसेने अचानक पणे महावितरण कार्यालयाची तोडफोड केली.

सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून संपूर्णपणे महावितरणमधील साहित्याचे नुकसान केले आहे. त्या ठिकाणी त्वरित पोलिस उपाधीक्षक बाबुराव महामुनी यासह शहरातील सर्व पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.