Video : सुप्रिया सुळेंनी उलगडलं शरद पवारांच्या पावसातील सभेचं गुपित

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला एकीकडे गळती लागली असताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बलाढ्य भाजपसमोर आव्हान उभं करत निवडणुकीत पक्षाला यश मिळवून दिले. तसेच सातारा येथील पोट निवडणुकीत अशक्यप्राय विजय मिळवला. सातारा येथील निवडणूक प्रचारातील शरद पवारांची पावसातील सभा चांगलीच गाजली होती. या सभेमुळे सातारा येथील जागा राष्ट्रवादीने खेचून आणली. या सभेचं गुपीत आज खासदार सुप्रिया सुळे यांनी उलगडलं.

शिवजयंतीचे औचित्य साधून खा. सुप्रियाताई सुळे यांनी नवी मुंबईचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात बोलत होते. यावेळी कामगार मंत्री ना. दिलीप वळसे पाटील, गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड आणि आ. शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित केले.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, साताऱ्यातील पावसातील सभेसाठी शशिकांत शिंदे कारणीभूत आहे. शिंदे यांचा त्यादिवशी वाढदिवस होता. त्यादिवशी मला त्यांचे अनेक फोन आले होते. मी फोन रिसिव्ह केला तेव्हा त्यांनी मला सॉरी म्हटले. मग मला प्रश्न पडला की, हे सॉरी का म्हणतात. मग शिंदे म्हणाले, की आम्ही सभा केली अन् त्या सभेत साहेब पूर्ण भिजले. हे ऐकूण मी कपाळाला हात लावला आणि म्हणाले की, अहो माझे वडील ८० वर्षांचे आहेत. त्यांच्या पायाला जखम झालेली आहे. ते म्हणाले की मी आणि साहेबांनी ठरवल होत “लढेंगे तो पुरी ताकत से नही तो नही लढेंगे”, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले.

शशिकांत शिंदे म्हणाले लढायच की मग शेवटपर्यंत लढणार. नंतर मला कळल की, सभा यशस्वी झाली. सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.