नगर : जिल्हा बँक निवडणूक; अवघ्या 4 जागांसाठी होणार मतदान

नगर – अहमदनगर जिल्हा सहकारी बँक संचालक मंडळाच्या अवघ्या चार जागांसाठी उद्या (ता.20) मतदान होत आहे. बिगरशेती मतदारसंघासाठी जिल्ह्यात तसेच सेवा सोसायटीच्या नगर, कर्जत व पारनेर मतदासंघात सकाळी आठ ते सायंकाळी चारपयर्र्ंत मतदान प्रक्रिया होणार आहे.

माघारीच्या अखेरच्या दिवशी संचालक मंडळाच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरीत चार जागांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक, याप्रमाणे चौदा मतदान केंद्रातील 17 बुथवर मतदान प्रक्रिया राबविली जाईल. मतदान केंद्रात मोबाईलबंदी असल्याची मााहिती निवडणूक अधिकार्‍यांनी दिली.

नगर, पारनेर व कर्जत येथे सेवा सोसायटीसाठी एक व बिगरशेती संस्थासाठीच्या मतदानासाठी प्रत्येकी एक, असे दोन बुथ असतील. जिल्ह्यात उर्वरीत ठिकाणी मतदान केंद्रावर केवळ बिगरशेती संस्थासाठीच्या मतदानासाठी एकच बूथ असेल.

रविवारी (ता. 21) निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळी 9 वाजता मतमोजणी होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर काम पाहत असून, सहायक निवडणक निर्णय अधिकारी म्हणून हरिश्चंद्र कांबळे व किशन रत्नाळे काम पाहत आहेत.

बँकेचे बिनविरोध संचालक होण्याची यांना मिळाली संधी…!
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, आमदार मोनिका राजळे, विवेक कोल्हे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, सीताराम गायकर, माधवराव कानवडे, अरूण तनपुरे, अमोल राळेभात, माजी आमदार राहुल जगताप, भानुदास मुरकुटे हे सेवा सोसायटी मतदारसंघातून संचालक म्हणून बिनविरोध निवडले गेले.

तसेच शेतीपूरक प्रक्रिया मतदारसंघातून आमदार आशुतोष काळे, अनुसूचित जाती/जमाती मतदारसंघातून अमित अशोक भांगरे, इतर मागासवर्गीय मतदारसंघातून करण जयंत ससाणे, विमुक्त जाती भटक्या जमातीतून गणपतराव सांगळे आणि महिलांसाठीच्या दोन जागांवर अनुराधा नागवडे व आशा तापकिर यांची बिनविरोध निवड झालेली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.