कोल्हापूर : निर्जंतुकीकरणासाठी शेंडा पार्कमधील तपासणी बंद

खासगी लॅबद्वारे तपासणी मात्र सुरुच : अहवाल प्रलंबित नाहीत

कोल्हापूर : शेंडा पार्क येथील सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याने एक दिवस येथे होणारी चाचणी बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, खासगी प्रयोगशाळेत स्वॅबची तपासणी सुरु असल्याने अहवाल प्रलंबित नाहीत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी आज दिली.

उद्या, 8 ऑगस्ट पासून शेंडा पार्क येथील प्रयोगशाळेत अहवाल तपासणीचे पूर्ववत काम सुरु होणार आहे. याठिकाणी नवीन मशीन आणि किट आल्याने तेथील क्षमता दीड हजार चाचण्यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.