कोल्हापूर: महापूर नुकसानीसाठी जिल्ह्याला 281 कोटी 80 लाख 86 हजार निधी प्राप्त – जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यासाठी जुलै 2021 महापूरात झालेल्या नुकसानीसाठी 281 कोटी 80 लाख 86 हजार इतका निधी प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

यामध्ये मयत व्यक्तींसाठी 24 लाख, सानुग्रह अनुदानासाठी 74 कोटी 56 लाख, मयत जनावरांसाठी 40 लाख, घर व गोठा पडझडसाठी 45 कोटी 98 लाख, हस्तकला कारागीर नुकसानीसाठी 6 कोटी 25 लाख, शेतीपिके नुकसानीसाठी 85 कोटी 70 लाख, जमीन खरडून जाणे – 3 कोटी 30 लाख, दुकानदार 52 कोटी 28 लाख, टपरी धारक 1 कोटी 66 लाख, मत्स्य नुकसानीसाठी 9 कोटी, इतका निधी प्राप्त झाला आहे, मागणी प्रमाणे सर्व निधी शासना कडुन प्राप्त झाला आहे, हा निधी वाटप प्रक्रिया या महिन्या अखेर पूर्ण होईल, असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.