नवी दिल्ली : भारतीय सैन्याने काश्मिरच्या बडगाममधून दोन दहशतवाद्यांचे सरेंडर करवून घेतल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सैन्य दलातील जवानांनी कोई बात बेटा म्हणत दोन्ही दहशतवाद्यांना आधार दिला आणि त्यांचे शस्त्र खाली ठेवून त्यांना सरेंडर करण्यास भाग पाडले आहे. दरम्यान, या जवानांच्या कृतीमुळे सर्वत्र भारतीय लष्कराचे कौतुक करण्यात येत आहे.
ही घटना जम्मू काश्मीर भागातील बडगाम येथे घडली आहे. सर्वांत जास्त दहशतवादी हल्ले या ठिकाणी होत असतात. हा व्हिडिओ १६ ऑक्टोबर २०२० चा असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय सैन्यांनी या दहशतवाद्यांना न मारता त्यांना वाचवले आहे. यानंतर एक दहशतवादी भारतीय सैन्यांचे आभार मानताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधील सैन्यांच्या आवाजानुसार जहांगीर असे एका दहशतवाद्याचे नाव असून त्याने अंगावरील कपडे काढून टाकले आहेत. तर सैन्यातील कमांडोंनी “शब्बास बेटा, आ जाओ, आ जाओ” म्हणत त्याला सरेंडर करवून घेत आहे. त्याचबरोबर या आतंकवाद्याच्या काकाला सुद्धा सरेंडर करण्यास लष्कराने भाग पाडले आहे. दरम्यान, भारतीय सैन्य दलाचा हा जुना व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून सैन्य दलाचे कौतुक नेटकऱ्यांकडून केले जात आहे.