वॉशिंग्टन – अमेरिकेतील इंडियाना प्रांतात एका भारतीय विद्यार्थ्याला भोसकण्यात आले आहे. वरुण असे या 24 वर्षे वयाच्या विद्यार्थ्याचे नाव असून जॉर्डन आंद्राद या 24 वर्षांच्या सहायकाने त्याच्यावर एका मंदिरामध्ये हा चाकू हल्ला केला. इंडियानामधील वालपारायसो शहरामध्ये रविवारी सकाळी हा प्रकार घडला.
या चाकू हल्ल्यामागील नेमक्या कारणांचा तपास अधिकारी शोध घेत आहेत. वरुण याला रुग्णालयात दाख करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे. तो वाचण्याची केवळ 5 टक्के शक्यता असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
हल्ल्यानंतर लगेचच हल्लेखोराला अटक करण्यात आली आणि त्याच्यावर शस्त्र बाळगणे आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर मसाज पार्लरमध्ये गेला असता, तेथे त्याच्या आगोदर आलेल्या वरुणशी किरकोळ कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली होती. आपल्याला धोका संभवू शकतो, असे वाटल्याने ही प्रतिक्रिया दिली, असे आंद्राद याने पोलिसांना सांगितले.