कोलकत्ताचे चेन्नई सुपर किंग्जसमोर विजयासाठी 162 धावांचे आव्हान

कोलकाता – क्रिस लिनच्या शानदार 82 धावांच्या जोरावर कोलकत्ता नाईट रायडर्स संघाने चेन्नईच्या संघासमोर विजयासाठी 162 धावांचे आव्हान ठेवले आहे.

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 161 धावा केल्या. कोलकाता नाइट रायडर्सकडून फलंदाजीत क्रिस लिनने 51 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 82 धावा काढल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून गोलंदाजीत इमरान ताहिरने 4 षटकांत 27 धावा देत सर्वाधिक 4 विकेट घेतल्या तर शार्दुल ठाकूरने 2 आणि मिचेल सैंटनरने 1 विकेट घेतली.

दरम्यान, आयपीएलच्या बाराव्या सत्रात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जला दिल्ली कॅपिटल्सप्रमाणेच कोलकाता नाइट रायडर्सवर सलग दुसरा विजय हवा आहे. घरच्या मैदानावर सलग दोन पराभव झाल्याने कोलकाता नाईट रायडर्स संघावर दबाव राहणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.