पुणे – भाजप नेते किरीट सोमय्या यांना शनिवारी पुणेमहानगरपालिका मारहाण झाली. जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची माहिती घेण्यासाठी ते पुणे महानगरपालिकेत आले होते. परंतु महापालिका आयुक्तांना भेटण्यापूर्वीच शिवसैनिकांनी त्यांना धक्काबुक्की केली होती. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी योग्य ती कलमं न लावल्याचा आरोप करीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून घटनाक्रम कळवला होता.
किरीट सोमय्या यांच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती घेण्यासाठी दिल्लीतून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत. या अधिकाऱ्यांनी आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली.