मुंबई – सिद्धार्थ म्हलोत्राची नवी नवरी कियारा अडवाणी लग्नानंतर चांगलीच चर्चेत आहे. कधी ती एअरपोर्टवर दिसली म्हणून चर्चेत येते तर कधी पार्लरमधून घरी जाताना ट्रोल होते. आता मात्र कियारा चर्चेत आली आहे ती म्हणजे एका अवॉर्ड फंक्शन दरम्यान रेड कार्पेटवर हजेरी लावल्यामुळे. खरं तर अनेकांना वाटलं होत कियारा पुन्हा एकदा ट्रोल होईल मात्र झालं उलटच. कियाराचा लूक पाहून फॅन्स काय ट्रोलर्सही अक्षरशः फ्लॅट झाले.
मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या झी सिने अवॉर्ड्सला कियाराने हजेरी लावली. या सोहळ्यासाठी फिल्म इंडस्ट्रीसोबतच टीव्ही जगतातील स्टार्सही हजर होते. गेल्या काही दिवसांमध्ये कियारा कोठेही दिसली तरी मंगळसूत्र आणि कुकवावरून तिला ट्रोल केलं जात होत. मात्र लग्नानंतर पहिल्यांदाच कियाराने एखाद्या पुरस्कार सोहळ्यासाठी हजेरी लावली. या सोहळ्याचे शानदार फोटो समोर येताच चाहते देखील कियाराचे लग्न झाले आहे हे विसरून गेल्याचे समजते.
या सोहळ्यात नुकतीच आई बनलेली आलिया भट्ट देखील स्टाईलमध्ये पोहोचली होती.यावेळी नुकतीच नववधू बनलेली कियारा लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. कियाराने लाल गाऊनमधील तिच्या आउटफिटचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यावरून फॅन्सने तिच्या लूकची चांगलीच तारीफ केली आहे. कियाराच्या लूकने फॅन्स घायाळ झाल्याचे त्यांच्या कमेंटवरून समजते.
View this post on Instagram
अनेकदा ट्रोल होणाऱ्या कियारावर मात्र यावेळी चाहत्यांनी चक्क प्रेमाचा वर्षाव केला आहे. ‘वाटत नाही ही मॅरीड आहे’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर दुसऱ्या एकाने ‘शादी के बाद भी इस खुबसुरतीका राज क्या है ? असा सवाल विचारला आहे. एरवी कियाराला ट्रोल करणारेही तिचे कौटू करताना दिसून येत आहेत.