फरहान अख्तरने खुलासा केला होता की तो आज 20 फेब्रुवारी रोजी डॉन 3 बाबत मोठी घोषणा करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर,फरहान चित्रपटात कियारा अडवाणीच्या सहभागाची घोषणा करण्यास तयार आहे. बॉलीवूड रिपोर्टनुसार कियारा अडवाणीला डॉन 3 मध्ये महत्त्वाच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले आहे. फरहान लवकरच याबाबत घोषणा करणार आहे. कियारा या भूमिकेत अगदी फिट बसेल असे चित्रपटाच्या दिग्दर्शकाला वाटत होते. या रोमांचक ॲक्शन फ्रँचायझीचा एक भाग होण्यासाठी कियारा देखील उत्साहित आहे.
फरहानने गेल्या वर्षी डॉन 3 चा टीझर रिलीज केला. शाहरुख खानच्या जागी रणवीर सिंग नवीन डॉन म्हणून काम करेल यातून तेव्हा कळेल होते.अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिली होती. बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत फरहानने डॉन ३ मध्ये शाहरुख खानची जागा घेण्याचे कारण सांगितले होते. या चित्रपटासाठी तो खूप उत्सुक असल्याचे त्याने सांगितले होते.
हेही वाचा
Rituraj Singh Died । ‘अनुपमा’ अभिनेता ऋतुराज सिंह यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन