Kiara Advani । बॉलिवूडचे लव्हबर्ड्स कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा त्यांच्या स्ट्रॉंग बाँडिंगमुळे चर्चेत राहतात. दोघांनीही त्यांच्या करिअरमध्ये कमी वेळात चांगली प्रगती केली.चाहत्यांनाही त्यांची जोडी खूप आवडते आणि त्यांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकतेच सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले.
View this post on Instagram
लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी सिद्धार्थ मल्होत्राने कियाराला काय गिफ्ट दिल याबद्दल सांगितले आहे. सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त दुबईला गेले होते. येथे ही जोडपे एका आलिशान हॉटेलच्या लॉन्चचा एक भाग बनले. या खास प्रसंगी या जोडप्याने आपल्या ग्लॅमरने सर्वांना आकर्षित केले.
कियाराला तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त कोणते गिफ्ट मिळाले असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेत्रीनेही अतिशय गोंडस उत्तर दिले, कियाराने सांगितले की, ‘तिला खूप प्रेम मिळाले.’ त्याच्या या उत्तरावर चाहतेही प्रतिक्रिया देत आहे.
कियारा आणि सिडची जोडी चाहत्यांच्या आवडत्या जोडींपैकी एक आहे. दोघांनी दुबईत लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. नुकताच सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या जोडप्याचे हे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
शेरशाह चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कियारा आणि सिद्धार्थ यांच्यात जवळीक वाढली होती. दोघेही या चित्रपटाचा भाग होते. यानंतर, दोन्ही कलाकारांनी फेब्रुवारी 2023 मध्ये राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लग्न केले. लग्नादरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते. दोघेही त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगले संतुलन राखतात.