लॉकडाऊनमुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्यास आता सुरुवात झाली आहे. आयुष्मान खुरानाचा “गुलाबो सीताबो’ हा चित्रपट 12 जून रोजी ऍमेझॉन प्राइमवर रिलीज होत आहे. त्याचबरोबर विद्या बालन “शकुंतला’ हा चित्रपटी ओटीटीवर रिलीज होणार आहे. या पाठोपाठ आता कियारा आडवाणीचा “इंदू की जवानी’ हा चित्रपटदेखील डिजीटल रिलीज करण्यात येणार आहे.
कियाराचा “इंदू की जवानी’ हा चित्रपट पूर्ण तयार आहे. त्याचे पोस्ट-प्रोडक्शनचे कामही जवळजवळ पूर्ण झाले आहे. हा चित्रपट जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार होता. पण तसे झाले नाही. अशा परिस्थितीत निखिल आडवाणी यांनी आता हा चित्रपट ऑनलाइन प्रदर्शित करण्याची तयारी दर्शविली आहे.
चित्रपट निर्मात्यांनी हा चांगला निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. हा चित्रपट कमी बजेटचा असल्याने ऑनलाइन रिलीज केल्यास पैसे सहज वसूल केले जाऊ शकतात. याबाबत निर्माता तीन मोठ्या ओटीटी प्लॅटफॉर्मशी चर्चा करत आहेत आणि जो कोणी त्यांना चांगली किंमत देईल त्यांना हा चित्रपट विकण्यात येईल.
दरम्यान, “इंदू की जवानी’ शिवाय कियारा “भूलभुलैया-2’मध्येही झळकणार आहे. यात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग लखनौमध्ये सुरू होते. पण लॉकडाऊनमुळे शूटिंग रद्द करण्यात आले आहे.