मुंबई – कच्च्या मालाच्या किमती वाढत असल्यामुळे काही वाहन कंपन्यांनी दरवाढ जाहीर केली. त्याचबरोबर काही कंपन्या दरवाढ जाहीर करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत किया कंपनीने आपल्या वाहनाच्या दरात तीन टक्क्यापर्यंत वाढ केली आहे. (Kia India Announces Up To 3 Percent Price Hike On Popular Models From April 1)
ही दरवाढ 1 एप्रिल 2024 पासून लागू होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात इतरही काही वाहन निर्माण करणार्या कंपन्या आपल्या वाहनाच्या दरात काही प्रमाणात वाढ जाहीर करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येऊ लागली आहे.
किया कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या पुरवठा परिस्थितीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. त्याचबरोबर कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागत आहे. आम्ही या वर्षात केलेली पहिली दरवाढ आहे. भारतात कार्यरत असलेल्या किया कंपनीने आतापर्यंत 11 लाख 60 हजार वाहने विकली आहेत.