गुजरात – गुजरात को. ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने (GCMMF) शनिवारी राज्यात अमूल दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.
खरं तर, गुजरात सहकारी दूध विपणन महासंघ (GCMMF), ही गुजरातराज्यातील दूध सहकारी संस्थांची सर्वोच्च संस्था आहे, जी सहसा दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा करते, परंतु यावेळी ती झाली नाही.
चारा आणि वाहतूक खर्च वाढल्याने दुधाच्या दरात वाढ झाली आहे असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अमूलने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ केली आहे.
अमूल म्हशीचे दुध आता 66 रु वरून 68 रु प्रति लिटर इतकी झाली आहे. तर अमूल गोल्ड ची किंमत 62 रु वरून 64रु प्रति लिटर, अमूल शक्तीची किंमत 56 रु वरून 58 रु प्रति लिटर, गायीच्या दुधाची किंमत 52 रु वरून 54 रु रुपये प्रति लिटर, अमूल ताजा ची किंमत 50 वरून 52 रु प्रति लिटर तर अमूल टी-स्पेशल 58 रु वरून 60 रु प्रति लिटर इतकी झाली आहे.