नवी दिल्ली : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणारी बातमी समोर येत आहे. कारण तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल 7 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिकांचे बजेट कोलमडणार असल्याचे दिसत आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ किंमत १७७३ रुपयांवरून १७८० रुपयांपर्यंत वाढली आहे. त्याचबरोबर घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. विशेष म्हणजे सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर किमतीत वाढ करण्यात आली आहे.
Oil marketing companies have increased the prices of commercial LPG gas cylinders by Rs 7/cylinder. Delhi retail sales price of 19kg commercial LPG cylinder increased from Rs 1,773 to Rs 1,780 per cylinder. No change in the prices of domestic LPG cylinders.
— ANI (@ANI) July 4, 2023
एप्रिल, मे आणि जूनमध्ये त्याच्या किमती कमी झाल्या. मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली. १ जून २०२३ रोजी तेल विपणन कंपन्यांनी LPG च्या किमतीत ८३ रुपयांनी कपात केली होती. यानंतर दिल्लीत त्याची किंमत १७७३ रुपयांवर गेली होती. मे महिन्यात व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत १७१.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. यानंतर दिल्लीत १९ किलोचा सिलिंडर १८५६.५० रुपयांचा झाला आहे.
एप्रिलमध्येही एलपीजीच्या किमतीत ९२ रुपयांनी कपात करण्यात आली होती. तसेच मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत सुमारे ३५० रुपयांनी वाढ करण्यात आली. घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्याच्या किमतीतील शेवटचा बदल १ मार्च २०२३ रोजी झाला होता. त्यानंतर तो ५० रुपयांनी स्वस्त करण्यात आला. दिल्लीत घरगुती एलपीजीची किंमत ११०३ रुपये आहे. तसेच कोलकातामध्ये ११२९ रुपये, चेन्नईमध्ये १११८.५० रुपये आणि मुंबईमध्ये १११२.५० रुपये प्रति सिलिंडर उपलब्ध आहे.