नवी दिल्ली – अभिनेत्री व भाजपच्या नेत्या खुशबू सुंदर यांची केंद्र सरकारने राष्ट्रीय महिला आयोगावर नियुक्ती केली आहे. त्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या आहेत. त्यांच्या निवडीबद्दल तामिळनाडु भाजपचे अध्यक्ष के अन्नामलाई यांनी खुशबू यांचे अभिनंदन केले आहे.
I thank our H’ble PM @narendramodi ji and the government of India for entrusting me with such a huge responsibility. I shall strive hard to protect, preserve & nourish Nari Shakthi which is growing leaps & bounds under your leadership. Looking forward eagerly. #JaiHind@NCWIndia pic.twitter.com/Tm5GTJPEDe
— KhushbuSundar (@khushsundar) February 27, 2023
महिलांच्या प्रश्नात सातत्याने दिलेल्या लढ्यामुळे त्यांना हा सन्मान मिळाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. खुशबू यांनीही या निवडीबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. आपण नारी शक्तीच्या मानसन्मान आणि संरक्षणासाठी प्रचंड कष्ट घेऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात पंतप्रधानांना भेटणार – मुख्यमंत्री शिंदे
खुशबू यांनी आधी द्रमुक पक्षाचे काम सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता सध्या त्या भाजपमध्ये आहेत. त्यांनी सन 2021 ची विधानसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांना द्रमुकच्या एन एझिहीलन यांच्याकडून पराभव पत्करावा लागला आहे.