खिलाडी कुमारच्या बहुचर्चित “अतरंगी रे’ची रिलीज डेट आउट; ‘या’ दिवशी झळकणार रुपेरी पडद्यावर

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी “अतरंगी रे’ हा चित्रपट खूपच प्रसिद्धीच्या झोतात आहे. आता चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर केली आहे. आनंद एल राय यांनी हा चित्रपट 6 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती दिली.

“अतरंगी रे’मध्ये अक्षयसह सारा अली खान आणि धनुष मुख्य भूमिका साकारत आहेत. या चित्रपटाचे शूटिंग गतवर्षी वाराणसी येथून सुरू करण्यात आले होते. चित्रपटगृह पुर्ण क्षमतेने खुली होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर अनेक चित्रपटाच्या रिलीज डेट जाहिर करण्यात येत आहेत.

हा चित्रपट रक्षाबंधनावेळी रिलीज करण्यात येणार आहे. यात सारा आणि धनुष पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. याशिवाय “रांझणा’नंतर आनंद यांचा हा दुसरा चित्रपट आहे, ज्यात धनुष मुख्य भूमिका साकारत आहे.

“अतरंगी रे’मध्ये सारा डबल रोल साकारताना पाहावयास मिळणार आहे. यात सारा, अक्षय आणि धनुष यांचा रोमांस चाहत्यांना अनुभवास मिळणार आहे. यात सारा ही एका बिहारमधील मुलीची व्यक्‍तीरेखा साकारत आहे. हा चित्रपट “व्हॅलेंटाइन डे’ला प्रदर्शित करण्याचा विचार होता. पण लॉकडाउनमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.