Big Breaking ; पुद्दुचेरीत अखेर काँग्रेस सरकार कोसळले; बहुमत सिद्ध करण्यात सरकार अपयशी

पुद्दुचेरी: पुदुचेरीतील काँग्रेस सरकारसाठी आजचा दिवस मोठा धक्का देणारा ठरला आहे. कारण सहा आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे अल्मपतात आलेले सरकार आज अखेर कोसळले आहे.

मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. काँग्रेसच्या सहा आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे हे सरकार पडणार, हे निश्चित होते. त्यामुळे व्ही. नाराणसामी आणि काँग्रेसच्या आमदारांनी बहुमत चाचणीआधीच सभात्याग केला. तत्पूर्वी व्ही. नारायणसामी यांनी आपल्या शेवटच्या भाषणात काँग्रेसच्या बंडखोर आमदारांवर शरसंधान साधले.

काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरले होते. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचे सरकार कोसळले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.