मुबंई – खेलो इंडिया राष्ट्रीय महिला लीग तायक्वांदो स्पर्धेत राधिका शर्मा हिने रजतपदकाची कमाई केली. ओरिसातल कटक येथे इनडोर स्टेडिअम येथे ९ ते ११ मार्च दरम्यान झालेल्या खेलो इंडिया तायक्वांदो स्पर्धेत केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली तसेच अरुणाचल प्रदेशीतल दिग्गज खेळाडूंना पराभूत करत राधिकाने ही कामगिरी केली आहे.
यापूर्वी राधिकाने २७ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान पॉंडिचेरी येथे झालेल्या खेलो इंडिया महिला लीग राष्ट्रीय पूर्व तायक्वांदो स्पर्धेच्या तिसऱ्या फेजमध्ये राधिका शर्मा, श्रेया पराडकर यांनी आपापल्या वजन गटात रजतपदके पटकावत अंतिम फेजमध्ये आपले स्थान पक्के केले होते. या स्पर्धेत श्रेया पराडकर हिने उत्कृष्ट खेळी केली परंतु मणिपूर सोबतच्या अतीतटीच्या सामन्यात तीला हार पत्करावी लागली.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/icc-test-ranking-2024-ravichandran-ashwin-became-the-number-one-bowler-in-the-world/
संघासोबत संघ प्रशिक्षक म्हणून अंतरा हिरे यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील एक्सलंट तायक्वादो अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या या खेळाडूंना राष्ट्रीय पदकविजेते लता कलवार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.